Ad will apear here
Next
हृषीकेश मुखर्जी
आनंद, गुड्डी, चुपके चुपके, अभिमान असे चित्रपट आठवले की हृषीकेश मुखर्जी यांचे नाव येते. हृषीदांचे चित्रपट व त्याचे रसग्रहण असे स्वरूप असलेले ‘हृषीकेश मुखर्जी’ हे पुस्तक जय अर्जुन सिंग यांनी लिहिले आहे.

हृषीदांच्या गाजलेल्या चित्रपटांचा यात समावेश आहेच, पण ‘मेम दीदी’, ‘मुसाफिर’, ‘अनुराधा’, ‘आलाप’, ‘असला-नकली’ अशा तुलनेने कमी चर्चेत राहिलेल्या चित्रपटांबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे, असे स्पष्ट करीत लेखकाने हृषीकेश मुखर्जी यांच्या बेमिसाल चित्रपटांची खूबसुरत दुनियेची सफर लेखकाने घडविली आहे. याचा प्रवास सुरू होतो तो हृषीदांच्या ‘मुसाफिर’मधील घर दाखविण्याच्या प्रसंगापासून. या साध्या, सरळ प्रसंगातून, पात्रांमधून हृषीदांची समाजाबद्दलची मते, विचार व्यक्त होतात, असे लेखकाने म्हटले आहे.

‘बीवी और मकान’ व ‘सत्यकाम’ या त्यांच्या कमी प्रतिसाद मिळालेल्या चित्रपटांमधील ठळक बाबी यात दाखवून दिल्या आहेत. हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटाबद्दल सांगतानाच त्यांचे जगणे, त्यांतील काही घटना, त्यांच्याबद्दलच्या अनेकांच्या आठवणीही यात कथन केल्या आहेत. याचा मराठी अनुवाद मानसी होळेहोन्नूर यांनी केला आहे.

पुस्तक : हृषीकेश मुखर्जी
लेखक : जय अर्जुन सिंग
अनुवादक : मानसी होळेहोन्नूर
प्रकाशक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन
पाने : २८७
किंमत : ३०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZLEBW
Similar Posts
घार हिंडते आकाशी एखाद्या बाईला तिळे झाले, तर ‘कसे सांभाळता हो तुम्ही,’ असा प्रश्न अनेकांच्या तोंडी येतो. याचा सामना करीतच शेफाली वैद्य यांनी अनन्या, अर्जुन आणि आदित्य या त्रिमूर्तींच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. या तिळ्यांच्या जन्मापासूनची जडणघडण त्यांनी ‘घर हिंडते आकाशी’मधून शब्दबद्ध केली आहे.
आपले सण आणि आयुर्वेद + साधे उपाय सोपे उपाय काही आजार साध्या, सोप्या उपायांनाही ते आटोक्यात आणता येऊ शकतात, पण हे उपाय म्हणजेच उपचार कोणते, याची माहिती तज्ज्ञाकडून घेणे हितावह असते. वैद्य य. गो. जोशी यांचे हे पुस्तक अशा उपचारांसाठी मार्गदर्शन करते.
वन डिश मिल एकट्याने राहण्याची कधी वेळ आली, तर जेवणाचे काय करायचे हा प्रश्न असतो. कधी कधी स्वयंपाक येत नसतो, तर कधी करायचा कंटाळा आला असतो किंवा कधी करायचे काय, असाही प्रश्न येतो. अशा वेळी कविता महाजन यांचे हे पुस्तक मदत करू शकते.
खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘मस्ट सी’ कॅटेगरीत आज दुसरी फिल्म, नव्हे खरं तर तीन फिल्म्स एकत्र! कारण एकाच कथेत या तीन फिल्म्स गुंतल्या आहेत. खरं पाहता तिन्ही फिल्म्स एकमेकांशिवाय अपूर्ण; कारण कथा आणि कथेतल्या पात्रांना वेगवेगळ्या काळांत जाऊन भेटल्याशिवाय आणि काही गोष्टी ‘घडवून आणल्याशिवाय’ कथा अपूर्ण! गोंधळलात ऐकताना? मग त्यासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language